नाशिकचे उद्योजक श्रीकांत पाटील यांनी मूल्यवान पुरस्कार – एक्सल्लेन्स अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट २०१८ पटकावला.

0
295

नाशिकचे तरुण उद्योजक श्रीकांत पाटील यांनी, दि. २४.नोव्हेंबर २०१८, दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सेमिनार – इंडियन एकोमोनिक डेव्हलोपमेंट अँड सोसिअल रेस्पॉन्सिबिलिटीएस या प्रसंगी भारतचा मूल्यवान पुरस्कार – एक्सल्लेन्स अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट, श्री.शिवराज पाटील, माजी गृह मंत्री यांचे हस्ते, सपत्नीक स्नेहा पाटील सोबत स्वीकारला.

श्रीकांत पाटील व स्नेहा पाटील, यांनी त्यांचा उद्योग परामौन्ट एन्टरप्रासिस, ब्रँड – पॅरेंटनाशिक, २००४ ला सुरु केला. गेल्या १५ वर्षात त्यांनी तो परदेशात पोहोचवला. सध्या त्यांची कंपनी ९ देशात स्पॉट वेल्डिंग मशीनचे पार्टस निर्यात करते. कमी वयात त्यांनी मिळवलेल्या यशाचे रहस्य सांगताना, ते म्हणाले, फक्त प्रामाणिकपाने अवितरत काम केल्यास यश हमखास मिळते. भारतात नवीन, तरुण उद्योजक निर्माण होणे आवश्यक आहे त्यासाठी ते कॉलेज, छोट्या उद्योजकांना मेंटॉर म्हणून मदत करत आहेत.

कंपनी बद्दल माहिती –
परामौन्ट इंटरप्रिंसेस (पॅरेंटनाशिक)
{रेसिस्टन्स वेल्डिंग कॉंसुमेबल्स,स्पेरेस मॅनुफॅक्टरर आणि निर्यात)
अंबड इंडस्ट्रियल एरिया, नाशिक, महाराष्ट्र, भारत- ४२२०१०